वेगवान नाशिक/ पराग बच्छाव
नाशिक पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की दिवाळीत चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढ होत असते त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे .
या सणात लक्ष्मी पुजन या दिवशी आपण सर्वजण घरातील दागदागिन्यांची व रोख रक्कमेची पूजा करण्याकरीता सर्व दागिने व रोख रक्कम लॉकरमधून बाहेर काढून पूजा करत असतात तसेच या दिवशी लक्ष्मी घरी येते म्हणून घराची सर्व दरवाजे खिडक्या रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवल्या जातात याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरटे इसम आपल्या घरातील उघड्या खिडकीतून दरवाजातून सदरचे दागदागिने, रोख रक्कम चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे सर्व नागरिकांना पोलिसांकडून सतर्क करण्यात येते की,आपले दाग दागिने, रोख रक्कम पूजा झाल्यानंतर सुरक्षित ठेवावे व घराची दारे व खिडक्या व्यवस्थित बंद कराव्या जेणेकरून संधीसाधू चोरांना चोरी करता येणार नाही. तसेच दिवाळी सण करता अनेक नागरिक हे गावी जात असतात त्यामुळे बंद घराचे निरीक्षण करून काही संधी साधू चोरटे घरफोडी करून आपले दाग दागिने, रोख रक्कम चोरी करण्याची शक्यता असते त्यामुळे सर्व नागरिकांनी गावी जात असताना आपल्या बंद घराकडे शेजाऱ्यांना लक्ष ठेवण्यास सांगावे तसेच आपल्या किमती वस्तू दागदागिने रोख रक्कम सोबत घेऊन जावी जेणेकरून आपल्या बंद घराची घरफोडी होणार नाही. सतर्क राहा, सुरक्षित रहा, असे पोलिसांनी सांगितले आहे.
दिवाळीच्या उत्सवात चोरट्यांचाही उच्छाद पहायला मिळतो. अनेक जण घर बंद करुन गावी जातात. काही जण खरेदीसाठी जातात तर काही जण लक्ष्मीपूजनासाठी आपल्या घरातील सर्व दागिने आणि रोख रक्कम पुजेसाठी बाहेर काढतात. या काळात चोरीच्या घटना सर्रास घडतात. त्यामुळे यासंदर्भात नाशिक पोलिसांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.