वेगवान नाशिक/ पराग बच्छाव
फटाके फोडून प्राण्यांना त्रास दिल्यास होईल कठोर शिक्षा; दिवाळी साजरी करताना कुत्रे, मांजर आणि पक्षी यांना इजा होणार नाही यांची काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून बुजून मुक्या प्राण्यांना फटाके फोडून त्रास दिल्यास फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो,
दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळीचा उत्साह सगळीकडे अधिक पाहायला मिळतोय. त्यातच लहान-मोठे असे सर्वच फटाके फोडण्यासाठी ही तेवढेच उत्साहित पाहायला मिळत आहेत. मात्र फटाके फोडत असताना पर्यावरणाचा -हास होणार नाही.
याची काळजी घेण्याचे आवाहन खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मात्र या सोबतच फटाके फोडताना मुक्या प्राण्यांची देखील काळजी घेण्यात यावी, असे आवाहन प्लांट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉस) आणि अम्मा केअर फाउंडेशन या प्राणी संघटनांकडून करण्यात येत आहे.
जखमी प्राण्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ : अनेक वेळा फटाके फोडताना लोकांनी इजा होणार नाही. याची काळजी घेतली जाते. मात्र आजूबाजूला असलेल्या प्राण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. मोठ्या आवाजाचे फटाके, यासोबतच प्रचंड धूर करणारे फटाक्यांमुळे ज्याप्रमाणे माणसावर विपरीत परिणाम होतात. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या प्राण्यांवरही विपरीत परिणाम होतात. कुत्रे, मांजर, पक्षी यांच्यावर या फटाक्यांचा मोठा परिणाम होत असतो.
त्यामुळे प्राणी आजाराने ग्रासले जातात. या आजारांची लागण गंभीर स्वरूपात झाल्यास प्राण्यांचा मृत्यूही होऊ शकतो. तसेच अनेक वेळा जाणूनबुजून काही समाजकंटक मुक्या प्राण्यांना इजा होईल, असे फटाके फोडतात. पेटवलेले फटाके कुत्रा, मांजर किंवा इतर प्राण्यांच्या आंगवर टाकले जातात. यामुळे प्राणी गंभीर जखली होतात. त्यामुळे मुक्या प्राण्यांची दया करत यावेळी मोठ्या उत्साहात आनंदात दिवाळी साजरी करत असताना त्या प्राण्यांचा विचार करावा असा आवाहन आम्हा केअर फाउंडेशनचे अध्यक्ष सूनिष कुंज यांनी केला आहे.
फौजदारी गुन्हा : दिवाळी सहित वर्षाच्या आखेरच्या महिन्यात काळात कुत्रे, मांजर आणि पक्षी हे जखमी होण्याच्या घटना होत असतात. यात अनेक वेळा प्राण्यांचा दुर्दैवी मृत्यू देखील होतो. या घटनांमध्ये दरवर्षी १० ते १५ टक्के वाढच होते. दरवर्षी जवळपास फक्त मुंबईत २०० ते २५० प्राणी जखमी झाल्याची नोंद होते. मात्र दरवर्षी जखमी प्राण्यांची संख्या वाढत असल्याने प्राणीमित्र सुनिष कुंजू यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच प्राण्यांना इजा पोहचवल्यास फौजदारी गुन्हा दाखल होतो. फटाके फोडताना कशी काळजी घ्यावी : फटाके फोडताना आजूबाजूला कोणी प्राणी आहेत का? हे पाहावे.फटाक्यांच्या आवाजाने घाबरून अनेकवेळा कुत्रा आणि मांजर रस्त्यावर सैरावैरा धावू लागतात. त्यात त्यांचा अपघात होऊ शकतो.
नॅशनल पार्क आणि प्राणी संग्रहलय परिसराच्या बाजूला फटाके वाजवू नयेत. मोठ्या आवाजाच्या फटाके सहसा फोडू नये. फटाके फोडताना कुत्रे किंवा मांजर झोपलेले असल्याने त्यांना उठवावे. जेणेकरून अचानक होणाऱ्या मोठ्या आवाजाने त्यांना त्रास होणार नाही. पाऊस किंवा रॉकेट लावताना पक्ष्यांना त्रास होणार नाही हे पाहावे.