उद्धव ठाकरे गटातील बडा नेता नाराज? गिरीश महाजन यांच्या विधानानंतर चर्चेला उधाण!


वेगवान

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या नेत्यांना आपापल्या गटात सामील करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहे.

उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हेदेखील शिंदे गटात सामील होतील, असा दावा मागील काही दिवसांपासून केला जात होता. असे असतानाच आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ट्विटरद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यानंतर आता भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी मोठे विधान केले आहे. मिलिंद नार्वेकर नाराज असल्याचे मी ऐकतोय असे महाजन म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *