करोनाची आणखी एक लाट येऊ शकते,” WHO च्या मुख्य शास्त्रज्ञांचा इशारा


वेगवान नाशिक

काही देशांमध्ये करोनाची आणखी एक लाट येऊ शकते असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे.

“काही देशांमध्ये करोना विषाणूचा व्हेरिअंट असणाऱ्या ओमायक्रॉनच्या XBB सबव्हेरियंटसह संक्रमणाची दुसरी लाट येऊ शकते असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

करोनाचे नवे व्हेरियंट वैद्यकीयदृष्ट्या अधिक गंभीर असल्याचं सूचित करण्यासंबंधी आतापर्यंत कोणत्याही देशाकडून माहिती उपलब्ध झाली नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की “ओमायक्रॉनचे जवळपास ३०० सबव्हेरियंट आहेत. यामधील XXB हा सध्या चिंता वाढवणारा आहे.

हे तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवरही मात करु शकतात. त्यामुळे काही देशांमध्ये XXB मुळे करोनाची आणखी लाट येऊ शकते”.

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *