दिल्लीः ऐन दिवाळीत देशावर चक्रीवादळाचं संकट घोंगावतंय. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सीतरंग चक्रीवादळ असं या वादळाचं नाव असणार आहे. २० ते २१ ऑक्टोबरच्या दरम्यान हे चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोलकाता येथील आयएमडीच्या प्रादेशिक हवामान केंद्राने ही माहिती दिली आहे.
अंदमान समुद्र आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सोम्य चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली असून आत्तापर्यंत हे वादळ अंदमान समुद्र परिसरात होते, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
ADV- Amazon- Min वर मेगा क्लीयरन्स स्टोअर. वॉशिंग मशिन, रेफ्रिजरेटर, एसी आणि चिमणीवर ५०-७०% सूट.
सीतारंग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून येत्या २३ आणि २४ ऑक्टोबरच्या सुमारास पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिवाळीत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील ४८ तासांत दक्षिण-पूर्व बंगाल आणि लगतच्या भागात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, २२ ऑक्टोबरपर्यंत याचं चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागाने जाहीर केलं आहे.