केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय


नवी दिल्लीः केंद्र सरकारने (Central Government) आता दिवाळीपूर्वीच सर्वसामान्यांना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून आता नागरिकाना स्वस्त धान्य उपलब्ध करून देण्याची मोठी घोषणा केली आहे. सरकारने डाळ आणि कांदा (Dal and onion) या दोन्हींच्या दरात घट करणार असल्याची घोषणा केली आहे. दिवाळीत खाद्यपदार्थांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे ग्राहक मंत्रालयाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आले आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने आता महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला असल्याचे सांगत राज्यांना अत्यंत कमी दरात डाळ उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने डाळींच्या किंमतीत आठ रुपयांनी कपात केली असल्याचे सांगण्यात आले आहे. आणि तेवढ्याच किंमतीत ही डाळ मिळणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना स्वस्त धान्य मिळणार आहे.

त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात महागाईपासून ग्राहकांना दिलासा मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

डाळींच्या किंमती कमी करण्याबरोबरच त्यापुढचे पाऊल उचलले आहे ते म्हणजे सरकारने कांद्याचेही भाव कमी केले आहेत.

ग्राहक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बाजारात कांद्याची कमतरता भासू नये म्हणून सरकार सणासुदीला बफर स्टॉकमधून कांदे पुरवत असल्याचे सांगितले आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत केंद्र सरकारकडून राज्यांना 88,000 टन डाळ उपलब्ध करून दिली आहे.

सरकारने मसूर डाळीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 500 रुपयांची वाढ केली आहे. यानंतर, मसूरचा एमएसपी 5,500 रुपयांनी वाढून 6,000 रुपये झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे याद्वारे हित साधले असल्याचेही म्हटले आहे.

विशेष म्हणजे ग्राहकांना गरज आणि गरजांची पूर्तता करण्यासाठी भारताकडून डाळींची आयात केली जाते. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2022 ते 2026 या आर्थिक वर्षात म्यानमारमधून दरवर्षी 2.5 लाख टन उदक आणि 1 लाख टन तूर डाळ देशात आयात केली जाणार आहे.

त्याबरोबरच पुढील पाच वर्षांत दक्षिण पूर्व आफ्रिकामधून 50 हजार टन तूर डाळ आयात केली जाणार आहे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *