राष्ट्रवादीला धक्का, खडसे समर्थकांना 6 वर्षांसाठी केलं निलंबित


वेगवान नाशिक

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला जळगावमध्ये मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेत एकनाथ खडसे यांच्या समर्थकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

भुसावळ येथील माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. नगरपालिकेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या एक दिवस आधीच तत्कालीन भाजपच्या नगराध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याच समर्थकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.

जळगावात भाजपच्या गिरीश महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देण्यासाठी एकनाथ खडसे प्रयत्न करत असतानाच नुकत्याच झालेल्या कारवाईने खडसे आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. भाजपचे तत्कालीन नगराध्यक्ष यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

निलंबित झालेल्या सदस्यांची नावे

रमण देविदास भोळे

अमोल इंगळे

लक्ष्मी रमेश मकासरे

प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे

मेघा देवेंद्र वाणी

बोधराज दगडू चौधरी

शोभा अरुण नेमाडे

किरण भागवत कोलते

शैलजा पुरुषोत्तम नारखेडे

पुष्पाताई रमेशलाल बतरा


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *