मुकेश अंबानीच्या होणाऱ्या सुनेचा Glamorous लूक


वेगवान  नाशिक

मुकेश अंबानी यांच्या होणाऱ्या सुनेविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. अनंत अंबानीची होणारी पत्नी आणि मुकेश अंबानी यांच्याशी खास नातं शेअर करणाऱ्या राधिका मर्चंटचा (Radhika Merchant) वाढदिवस नुकताच पार पडला. खास मित्रपरिवारासोबत तिनं हा दिवस साजरा केला. या क्षणांचे काही फोटो सोशल मीडियावर असणाऱ्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आले. जिथे ‘अरंगेत्रम’च्या वेळी अगदी पारंपरिक वेशात दिसलेली राधिका इथे मात्र ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे.

राधिका ‘एनकोर हेल्थकेयर’चे CEO आणि उपाध्यक्ष वीरेन मर्चंट यांची मुलगी. ‘बीडी सोमानी इंटरनॅशनल स्कूल’मधून तिनं आयबी डिप्लोमाचं शिक्षण घेतलं. त्याआधी तिनं मुंबईतच शालेय शिक्षण पूर्ण केलं. राधिकानं राजकारण, अर्थशास्त्र या विषयांमध्ये न्यूयॉर्क विश्वविद्यापीठात स्नातक पदवीही घेतली.

पाहा : जगातल्या १० सुंदरी, एकमेव भारतीय आणि तीही टॉपवर
अंबानी कुटुंबाशी (Ambni Family) असणारं राधिकाचं नातं (akash ambani shloka mehta) आकाश आणि श्लोका अंबानी यांच्या साखरपुड्याच्या वेळी समोर आलं. यादरम्यान अभिनेता (Shah rukh khan) शाहरुख खान, राधिकाला अनंतच्या नावानं छेडताना दिसला होता.

अनंत आणि राधिकाचं हे नातं आता सर्वज्ञात आहे. तिचं या धनाढ्य कुटुंबात असणारं स्थानही तितकंच खास आहे. राधिकाला अंबानी कुटुंबाकडून वाढदिवसाला खास भेट मिळाली असणार यात शंका नाही. तूर्तात नेटकऱ्यांना मात्र तिच्या बर्थडे पार्टीच्या फोटोंवरच समाधान मानावं लागत आहे.

अधिक वाचा : कोणी जुना अभिनेता नव्हे, हे आहेत देशातील प्रख्यात व्यावसायिक; ओळखलं का?
Instagram वर उपलब्ध असणाऱ्या फोटोंनुसार राधिकानं ‘सोलेस लंदन’ या ब्रँडचा हॉटपिंक मिनी स्ट्रॅपलेस ड्रेस घातला होता. यामध्ये ती कोणा बाहुलीप्रमाणेच दिसत होती. तिच्या या सॅटिन ट्विल असणाऱ्या ड्रेसची किंमत 685 युएस डॉलर म्हणजेच 56,271 रुपये इतकी आहे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *