शिंदे गटाचे आमदाराला हृदयविकाराचा झटका, त्वरीत मुंबईला हलविले


वेगवान 

औरंगाबाद ः  औरंगाबाद चे शिंटे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat Heart attacked) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

संजय शिरसाट यांना औरंगाबादहून उपचारासाठी मुंबईला आणण्यात येतय. एअर अंबुलन्सने संजय शिरसाट यांना मुंबईला (Aurangabad Sanjay Shirsat) रवाना करण्यात आलंय. काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मात्र, आज सकाळी तातडीने उपचारासाठी त्यांना मुंबईला (Sanjay Shirsat News) रवाना करण्यात आलं.

काल दुपारच्या सुमारच्या सिग्मा रुग्णालयात आमदार शिरसाट यांना दाखल करण्यात आलं होतं. अस्वस्थ वाटत असल्यानं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं.

24 तासांच्या आत मुंबईसाठी रवाना
त्यानंतर 24 तासांच्या आतच त्यांना औरंगाबादहून मुंबईल उपचारासाठी नेलं जावं, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने दिला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलंय.

संजय शिरसाट हे अनेक दिवसांपासून अस्वस्थ आणि नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळेही राजकीय वातावरण तापलं होतं. अशातच आता त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी घडामोड समोर आलीय.

एअर एम्ब्युलन्सने मुंबईला
संजय शिरसाट यांना औरंगाबाद विमानतळावर जेव्हा आणण्यात आलं, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी लगबगही विमानतळावर पाहायला मिळाली. त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. औरंगाबादेतील डॉक्टरांशीही याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यांनी यावर बोलणं टाळलं.

अत्यंत तातडीने मुंबईला संजय शिरसाट यांना आणण्यात येतंय. मुंबईतल्या कोणत्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे, याची माहिती समोर आलेली नाही. औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मुंबईला उपचारासाठी नेण्यात यावं, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर त्यांना एअर एम्ब्युलन्सने मुंबईत आणलं जातंय.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *