नाशिक जिल्ह्यात पावसाच कहर, तर महाराष्ट्रात पाऊसचं पाऊस


वेगवान नाशिक

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने दैना उडवून दिली आहे. (Heavy rain) दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर कालही पुन्हा जोरदार पाऊस झाला. तर आठवड्यापूर्वी कोकणात मुसळधार पाऊस कोसळत होता. (Heavy rain in Konkan) काल पुन्हा दक्षिण रायगडमध्ये जोरदार पाऊस झाला. महाड आणि परिसरात ढगांच्या गडगडाटसह जोरदार पावसाच्या सरी बरसल्यात. या पावसानं आनेक रस्ते जलमय झाले. शेतात पाणी साचल्यानं शेतक-यांच्या चिंतेत वाढ झाली. अचानक आलेल्या पावसानं अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

पावसाने नाशिककरांचे प्रचंड हाल
नाशिक शहरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नाशिककरांचे प्रचंड हाल झाले. नाशकात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसामुळे सर्व खड्ड्यांमध्ये पाणी भरत असून यामुळे नागरिकांना वाहने चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.

नाशकात देवळाच्या मेशीसह पूर्व भागाला परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतात कापून ठेवलेल्या मकाच्या बिट्या पूर्णपणे पाण्यात भिजल्या. तर काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचंही मोठं नुकसान झालं. पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हवालदिल झालाय.

चांदवड तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी खरोखर कंगाल झाला आहे.

विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतक-यांमध्ये धडकी भरलीय. कारण पावसाचा सोयाबीन, कपाशी पिकांना जोरदार तडाखा बसलाय. धुंवाधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. तर नाले भरून वाहू लागले.

पुण्यात मुसळधार पावसाने हाहाकार
दरम्यान, पुण्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार उडवला आहे. पुण्यात विविध भागात पावसाच्या पाण्याने दैना उडवली. विविध भागात पाण्यात अडकलेल्या जवळपास 12 जणांची अग्निशमन दलाने सुटका केलीय. रात्री नऊच्या सुमाराला सुरू झालेल्या पावसाने रात्री पावणेदहापासून उग्र रूप धारण केलं. रात्रभर तुफान पाऊस कोसळत होता. रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं रूप आलं होतं. अनेक भागात झाडं कोसळली, त्यात काही जण जखमी झाले.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *