सिटीलिंकच्या बसने घेतला वृद्धाचा बळी !


वेगवान नाशिक
पंचवटी : NASHIK नाशिक शहरात असलेल्या सिटी लिंकच्या बसने एका वृद्धाचा जीव घेतला आहे . रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धाला सिटीलिंकच्या बसने धडक देऊन वृद्धाला उडविले . मात्र,त्याला रुग्णालयात घेऊन न जाता बस चालक फरार झाला . तीन दिवसांच्या उपचारानंतर या वृद्धांचे निधन झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त करीत बस चालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे . याबाबत सारंग हरीश कानडे यांनी अज्ञात बस चालकाविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे . citylink-bus-killed-an-old-man
              बुधवार दि १२ रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हरीश रामदास कानडे ५४ रा जोशी वाडा नागचौक पंचवटी हे कामावरून घरी परतत असताना काट्या मारोती चौकाकडून निमाणी कडे येणाऱ्या रस्त्यावरील वाघाडी येथील पुलावरून जात असताना मागून आलेल्या सिटीलिंकच्या बसने त्यांना ठोस मारत त्यांना उडविले . अपघातानंतर जखमी हरीश कानडे यांना रुग्नालयात घेऊन जाण्याऐवजी बसचालकने बस घेऊन घटनास्थळावरून फरार झाला .
              अपघातानंतर आजूबाजूच्या नागरीकांनी जखमी कानडे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले . अपघातात कानडे यांच्या डोक्याला,छातीला आणि कमरेला जबर मार लागल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते . मात्र,रविवार दि १६ रोजी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले . या घटनेमुळे संशयित बस चालकाविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे .
सिटीलिंकच्या बस चालविणारे जवळपास सर्वच ड्रायव्हर हे तीस ते पस्तीस वयोगटातील असून,त्यांना बस चालवायचा म्हणावा तेवढा अनुभव नाही . त्यात बस खूपच वेगाने चालवीत अन्य वाहनांना कट मारण्याचे अनेक प्रकार रस्त्यावर दररोज घडत असतात . सुसाट वेगाने धावणाऱ्या आणि त्यांना हाकणाऱ्या चालकांना योग्य समज देऊन बस हळू चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे . 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *