मुलीला फरफटत नेणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर अटक


वेगवान

ठाणे :ठाण्यात मुलीला फरफटत नेणा-या रिक्षाचालकाला अटक करण्यात आलीय (Girl molested by auto driver in thane)…नवी मुंबईतून आरोपी कटिकादाला उर्फ राजू विरांगनेलूला अटक करण्यात आलीय…मुंबईतील दिघा येथून या रिक्षाचालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

मुलीला फरफटत नेतानाचा व्हिडिओ व्हायरल (viral video) झाला होता…त्यानंतर विनयभंग (harrasement) आणि छेडछानी  केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तातडीने या रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याला चौकशीसाठी हजर करण्यात आलंय…आरोपी राजू हा मुळचा आंध्र प्रदेशचा (aandhra pradesh) आहे…त्याने असं का कृत्य केलं…? मुलीला फरफटत नेण्याचं खरं कारण काय होतं…? याची चौकशी सुरूयेय.

ही संपूर्ण घटना सकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात 21 वर्षांची मुलगी जखमी झालीये, मुलीला फरफटत नेल्याचं कारण हे चौकशी नंन्तर समोर येईलच, मात्र हा संपूर्ण प्रकार अत्यंत संतापजनक आहे हे नक्की.

नेमका काय होता प्रकार
ठाणे स्टेशन रोड परिसरात एक शाळकरी मुलगी रिक्षातून उतरते मात्र रिक्षाचालक तिचा हात पकडून काही अंतर तिला अक्षरशः फरफटत नेतो त्यांनतर ही मुलगी रस्त्यावर पडली आणि जखमी झाली. या विद्यार्थिनीला दुखापत झाली आणि हा संपूर्ण प्रकार जवळील cctv मध्ये कैद झाला. यांनतर रिक्षाचालकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *