वेगवान
मुंबई ः आज आणि उद्या पुण्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.दरम्यान, शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने पुण्यातील सगळेच मुख्य रस्ते जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.
परतीचा प्रवास कधी?
एकीकडे ऑक्टोबर महिना अर्धा उलटला तरीही राज्यात मान्सूनचा पाऊस बरसतोच आहे. राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाच्या सरी अजूनही बरसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढवली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा परतीच्या पावसाचा प्रवास लांबलाय. अशातच आता पावसाचा परतीचा प्रवास केव्हा सुरु होणार, याबाबतही महत्त्वाची अपडेट समोर आलीय.
पुढील तीन दिवसांत पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागातून मान्सून परतेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर चक्रीय स्थितीमुळे राज्यातील काही भागात 20 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे.
प. महाराष्ट्रात 3 दिवस पावसाचे
प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सातारा तसंच कोकणातील काही भागात पुढचे तीन दिवस पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाने याबाबतची अंदाज वर्तवलायी