चांदवडः नव-यावर अज्ञातांनी प्राणघातकं हल्ला केला व तो ठार झाला, पण याचे सुत्रधार पत्नी का होती..


वेगवान नाशिक

चांदवड (जि. नाशिक) : कातरवाडी येथील तरुण शेतकऱ्यांच्या खून प्रकरणी चांदवड पोलिसांना 48तासांत या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळाले आहे. पत्नीनेच प्रियकराच्या साथीने आपल्या पतीचा खून केला आहे. प्रेयसी मनिषा झाल्टे हिचा पती आपल्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानेच प्रियकर सुभाष संसारेने मित्राच्या मदतीने मदतीने सोपान झाल्टेचा काटा काढला आहे.

मयत सोपान बाबुराव झाल्टे याची पत्नी मनीषा सोपान झाल्टे हिचे कातरवाडी येथीलच सुभाष संसारे याच्याशी गेल्या दोन-तीन वर्षापासून अनैतिक संबंध होते. आपल्या अनैतिक संबंधांमध्ये पतीचा अडचण ठरत असल्याने या दोघांनी मित्राच्या मदतीने सोपान झाल्टेचा काटा काढला आहे. सोपान झाल्टे हा शेती बरोबरच ट्रकचा व्यवसाय करत होता. तो घरी आल्याचे त्याची पत्नी मनीषाने सुभाष संसारेला सांगितले. त्यानंतर सुभाष संसारे याने आणि मनमाड येथील त्याचा मित्र खलील ह्याला बरोबर घेतलं मनमाड येथूनच लाकडी दांडके बरोबर आणले.

रात्रीच्या वेळेस संधी साधून सोपान झाल्टे हा त्यांच्या मळ्यात पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेला असतानाच, त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्याच्यावर लाकडी दांडुक्याने हल्ला चढवला आणि त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला केल्याने सोपानचा जागेवरच मृत्यू झाला. यावेळी सोपानचे वडील बाबुराव झाल्टे हे मध्ये आल्यानंतर त्यांनाही लाकडी दांडक्याने आरोपींनी मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या गंभीर प्रकरणाचा तपास लावण्याचे चांदवड पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

नाशिक ग्रामिणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी समीर सिंग साळवे, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी तपासाला गती दिली आणि अवघ्या 48 तासांमध्ये आरोपींना जर बंद केले या प्रकरणांमध्ये जवळपास पंधरा साक्षीदार पोलिसांनी तपासले. साक्षीदारांचे जबाब आणि पोलिसांचा गुप्तचर विभाग यांच्या माहितीतून मयत सोपान झाल्टेची पत्नी मनीषाला ताब्यात घेतले.

तिच्या जबाबातून उलट सुलट माहिती आल्याने पोलिसांनी मनीषा वर लक्ष केंद्रित केले आणि मोबाईल लोकेशन आणि मनीषाचे जबाब यातून अखेर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच मनीषाला बोलत केलं आणि तिचा प्रियकर सुभाष संसारेला ताब्यात घेतले. सुभाषच्या हाताला झालेली जखम आणि सुभाषची उलट सुलट प्रतिक्रिया यातून पोलिसांनी सुभाष संसारे व मयताची पत्नी मनीषा आणि मनमाड येथील खलील शहा या तिघांना अटक केली आहे आणि तिघांवरती खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्या तिघांनाही चांदवड पोलिसांनी जेरबंद केले आहे. इतक्या कमी वेळामध्ये चांदवड पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास लावल्याने चांदवड पोलिसांचे सर्व स्तरांमधून खरोखर अभिनंदन केले जात आहे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *