शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांना धमकी


वेगवान

मुंबईः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना धमकी देण्यात आली आहे.

आपल्याला धमक्या दिल्याचा दावा सुषमा अंधारे (sushma andhare threat) यांच्याकडून करण्यात आला आहे. पण गप्प बसणार नाहीत, असंही अंधारे यांनी म्हटले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यात महाप्रबोधन रॅली काढण्यात येणार आहे. याची सुरुवात ठाण्यातून झाली. यावेळी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन रॅली काढण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढवत चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांवर टीका केली म्हणून त्यांच्यावर ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *