पाकिस्तानचा ड्रोन भारताच्या हद्दीत, जवानांनी केलं फायरं…


वेगवान

देशातील शांतता भंग करण्यासाठी शेजारी राष्ट्राच्या कुरापती सुरु असतानाच आता एक मोठी कारवाई पंजाब प्रांतात करण्यात आली आहे.

भारत – पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर (ind pak loc) सुरु असणाऱ्या घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे.

भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून (India Pakistan border) घुसखोरी करून आलेला ड्रोन पंजाबमध्ये पाडण्यात आला. शुक्रवारी सकाळी 4.30 वाजता बीएसएफने (BSF) ही कारवाई केली.

बीएसएफ जवान पहाटे अजनाला गावालगत असलेल्या जंगलात गस्त घालत होते. तेव्हा जवानांना ड्रोनचा आवाज ऐकू आला. त्याचा शोध घेतला असता पाकिस्तानातून हा ड्रोन (Drone from pakistan) आल्याचं दिसलं. ज्यानंतर बीएसएफ जवानांनी तातडीने 17 राऊंड्स फायर करून हा ड्रोन पाडला.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *