वेगवान
सध्याच्या काळात सर्वच वयोगटांमध्ये स्क्रीन टायमिंग (Screen Timing) अर्थात मोबाईल, संगणक किंवा तत्सम उपकरणांवर वेळ घालवण्याला पसंती दिली जाते. असंख्य अॅप्स, सोशल मीडिया आणि इंटरनेटची (Internate) उपलब्धता या साऱ्यामुळं टेकसॅव्ही होण्याकडेच अनेकांचा कल दिसतो.
आज आपण फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला केंद्रस्थानी ठेवत आहोत. Facebook वर अनावधानानं काही अशा चुका होत असलीत ज्यामुळं तुमची रवानगी थेट कारागृहात होऊ शकते.
फेसबुकवर लागल्या तेवढ्या कमेंट करा, पोस्ट टाका, मात्र जर तुम्ही चुकीची पोस्ट टाकली, किंवा कोणाच्या पोस्टला अभद्र शब्द वापरले, किंवा अश्लील शब्दांचे कमेंट केली तर तुम्हाला जेल मध्ये जावे लागणार आहे.
लोकशाही देशामध्ये तुम्हाला व्यक्त होण्यासाठी स्वातंत्र्य आहे. मात्र मनात येईल त्या पध्दतीने तुम्ही जर वाईट शब्दांचा वापर केला तर तुम्हाला जेल होईल.