वेगवान
महाविकास आघाडी सरकारकोसळ्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंजूर केलेली कामे रद्द केल्याने शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. तब्बल 1 हजार कोटींची कामे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रद्द केली आहे. यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या आमदारांना मंजूर केलेली 1 हजार कोटींची कामे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रद्द केली आहेत. यामध्ये तब्बल 82 कोटींची कामे ही शिंदे गटातील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील होती. मुख्यमंत्र्यांच्या मंजूरीनंतरही ही कामे रद्द केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कामे रद्द झाल्यानं शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतलीय.
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या महिन्याभरात सर्व खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे असताना त्यांनी आपल्या गटाच्या 40 आमदारांना 2515 अंतर्गतची 1 हजार कोटींची कामे मंजूर केली होती. परंतु वित्त विभागाची कोणतीही मान्यता न घेता ही कामे मंजूर केली गेली होती. वित्त विभागाच्या 2515 अंतर्गत केवळ 300 कोटींचे बजेट असताना 1 हजार कोटी कामांना मंजुरी दिली गेली होती. त्यानंतर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर या कामांसह 21 एप्रिल 2021 नंतरची दिलेली कामेही जीआर काढत रद्द केली आहेत.