Political News उद्धव ठाकरे यांना शिंदे गट धक्का देण्याची तयारीत?


वेगवान

मुंबई : Political News : आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, ऋतुजा लटके यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. (Andheri By Election 2022) त्यामुळे ऋतुजा लटके या महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार फोडण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील उमेदवार ऋतुजा लटके यांना आपल्याकडे आणण्याचा शिवसेना बाळासाहेबांची अर्थात शिंदे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आणि भाजप युतीची उमेदवारी त्यांना द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *