युक्रेनच्या शहरांवर रशियाकडून क्षेपणास्त्रांचा हल्लाःजगाला आता ही भिती


वेगवान 

रशियाकडून युक्रेनवर होणारे हल्ले सातत्यानं वाढवण्यात येत आहेत. राजधानी किवसह युक्रेनच्या इतरही बऱ्याच शहरांवर सोमवारी रशियाकडून क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आला आहे.

यामध्ये अनेकजण मारले गेल्याचीही माहिती समोर आली आहे. युक्रेनने क्रिमिया आणि रशिया यांना जोडणारा पूल पाडल्याचा आरोप करत या प्रकणात रशिया अधिक संतप्त भूमिकेत पाहायला मिळत आहे.

सध्याच्या घडीला या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जग पुन्हा एकदा अण्वस्त्रांच्या सावटाखाली जगत आहे हे स्पष्ट होतंय. पुतीन युक्रेनवर अण्वस्त्रांचा वापर करून जगाला अणुयुद्धाच्या गर्तेत लोटतील अशी शक्यताही आहे.

युक्रेनच्या नैऋत्येला झेपोरेझिया शहरात रशियाने सोडलेल्या क्षेपणास्त्रांमुळे 14 नागरिक ठार झाले. क्रिमियातील पूल पाडल्यामुळे युक्रेनमधील रशियन सैन्याची रसद तुटली. त्यामुळे युक्रेनमध्ये घुसलेल्या रशियन सैन्याची चांगलीच कोंडी झाली

सदर भागातला जीवघेणा हिवाळा लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे पुतीन चांगलेच संतापले आहेत. युक्रेनची ही दहशतवादी कारवाई असल्याचं रशियाच्या संरक्षण खात्याने म्हणत या कारवाईचा विरोध केला आहे.

युद्ध थांबवण्यासाठी रशियातूनही दबाव वाढतोय. युरोपीय राष्ट्रही पुतीन (Vladimir Putin) यांच्याविरोधात गेली आहेत. त्यामुळे पुतीन हा दबाव झुगारण्यासाठी अण्वस्त्रांचा वापर करतील अशी दाट शक्यता आहे.

एकिकडे रशियाकडून युक्रेनवर हवाई हल्ले वाढवले असतानाच रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी या हल्ल्यांचा उल्लेख First Episode असा केला आहे. ही तर सुरुवात असून, ही परिस्थिती पुढेही अशीच सुरु राहील असे सुतोवाच करत त्यांनी युक्रेनला इशारा दिला.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *