वेगवान
मुंबई : Saamana Editorial on Shiv Sena Symbol and Shiv Sena Name freeze : महाराष्ट्राच्या दुष्मनांचं दफन करा, त्यावर त्यांची नातवंडेही थुंकतील असा हल्लाबोल दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून शिंदे गट, भाजपवर करण्यात आला आहे.
भाजप आणि त्यांचे सध्याचे सूत्रधार नामर्द आहेत, त्यांनी मिंधे गटाच्या बृहन्नडा, शिखंडींना पुढे करुन शिवसेनेच्या पाठीत बाण खुपसला, अशी कडाडून टीका ‘सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
शिवसेना ही शिवरायांचा अंश आहे, त्याचं अस्तित्व कसं मिटवाल असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
खोक्याच्या चिता, दुष्मनांची थडगी
भाजप आणि त्यांचे सध्याचे सूत्रधार नामर्द आहेत. मिंधे गटाच्या बृहन्नडांना, शिखंडींना पुढे करून शिवसेनेच्या पाठीत बाण खुपसला गेला आहे. शिवसेना ही खोकेवाल्यांसारखी विकाऊ संघटना नाही. अनेक शिंदे मिंधे येत जात असतात. मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही.
जनतेने खोक्याच्या चिंता पेटवल्या की गेंड्याची कातडीही जळून जाईल. ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद आहे. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे. त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील, अशी कडाडून टीका ‘सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.