वेगवान
शिंदे-फडणवीस सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या 100 दिवसांच्या कामाची माहिती लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी मंत्री आणि आमदारांवर सोपवण्यात आली असल्याची माहिती आहे. यासाठी ही ही महत्वाची बैठकी दरम्यान राडा झाल्याचे माहिती समोर येत आहे.
शिंदे गटाने वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) राडा केल्याची चर्चा सुरू आहे. वर्षा बंगल्यावरील बैठकीत अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्र्यांसमोर शिवीगाळ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या खासगी सचिवाला शिविगाळ केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर सत्तार हे वर्षा बंगल्यावरील बैठकीतून निघून गेले.
यावेळी अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवांवर भडकले आणि त्यांना शिविगाळ केली. या प्रकारामुळे शिंदे गटाच्या नेत्यांना धक्का बसला.
शिंदे गटातील मंत्र्यांनी आणि आमदारांनी या प्रकरणी मध्यस्थी केली. शिविगाळ प्रकरणानंतर सत्तार यांनी वर्षा बंगल्यातील बैठक अर्ध्यावर सोडली आणि माघारी गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.