वेगवान
नाशिक शहरातील औरंगाबाद (Nashik Bus Accident) रोडवरील मिरची हॉटेलजवळ शनिवारी भीषण अपघात झाला. या अपघातात लक्झरी बसने पेट घेतल्यात त्यामध्ये होरपळून 12 जणांचा मृत्यू झाला.
नाशिकमधील मिरची हॉटेल चौफुलीवर ट्रक आणि चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.
ट्रक आणि बसची टक्कर झाल्याने बसने पेट घेतला आणि ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने बसचा कोळसा झाला.
मात्र या घटनेत 12 निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.
या अपघात प्रकरणी आडगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.