वेगवान नाशिक / अरुण थोरे
नाशिक
चाळीत साठवलेला कांद्याची मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ दिसुन येत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.
एकीकडे अतिवृष्टीने लाल कांद्याच्या लागवडींना ब्रेक लागल्याने, लाल कांद्याचा सीजन महिनाभर पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असताना, चाळीत साठवलेला कांदा चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत खराब झाल्याने व अपेक्षित भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
यंदा मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादनात भरमसाठ वाढ झाल्याने कांदा बाजार भावात वाढ नसल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत, तर आयातीत सातत्य नसल्याने बहुतेक देशांनी भारतीय कांद्याकडे पाठ फिरवल्याचे सांगीतले जात आहे.
अनेक अग्निदिव्यातून वाचवुन पिकवलेला कांदा मातीमोल भावात विकण्याची वेळ उत्पादंकावर आल्याने, उत्पादन खर्चही निघतो की नाही अशी अवस्था शेतकर्यांची झाली आहे. राजकीय अनस्था आणि निसर्गाचा कोप यातुन शेतकरी खचल्याच चित्र दिसत आहे. सरकारने कांदा प्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा कांदा उत्पादक करत आहे.