ब्रेकींगः नाशिक जिल्ह्यात पुन्हा दुसरी बस पेटली


वेगवान

नाशिक येथे खासगी बसला पहाटे भीषण आग लागल्याची घटना झालेली असतांना दुपारी बारा वाजेच्या दरम्यान श्री सप्तशृंगी गड येथे ग्रामपंचायतच्या टोलनाक्याच्या जवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

एसटी बस पिंपळगाव बसवंत डेपोची होती. (बस क्रमांक एम एच १४ बीटी ३७५२) प्रसंगावधान राखून चालक आणि वाहक यांनी सर्व प्रवाशांना खाली उतरवले.

यात्रा नियंत्रण समितीने तातडीने तेथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक स्वयंसेवक, विश्वस्त संस्थेचे सुरक्षा कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, रोप वे कर्मचारी आदी यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करून फायर एक्स्टिंविशर द्वारे तातडीने आग विझविली.

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *