वेगवान
सध्या राजकीय पटलावर ठाकरे आणि शिंदे यांच्यातून ( Eknath Shinde And Uddhav Thackeray) विस्तवही जात नाही.
शिंदे यांचं वेगळे झाल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कालच झालेल्या दसरा मेळाव्यात मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे एकमेकांनी एकमेकांवर प्रचंड टीका केली सर्वसाधारण शिवसैनिकांना विचारलं तर त्यांना अजूनही सर्व शिवसैनिकांनी पुन्हा एकत्र यावं असं वाटतंय.
इतके वर्ष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे शिवसैनिक, इतके वर्ष एकमेकांच्या सुखदुःखात सामील होणाऱ्या शिवसैनिकांमध्ये देखील उभी फूट पडली आहे. राजकीय विश्लेषकांना याबाबत विचारलं तर दोघांमध्ये दिलजमाई होईल असं वाटतं नसल्याचं उत्तर मिळतं.
मात्र महाराष्ट्रातील जुन्नरमध्ये ठाकरे आणि शिंदे यांची मनं जुळली आहेत, आणि तिथे ठाकरे आणि शिंदे यांनी यापुढे सर्व सुख दुःखात एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे अधिकृत फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत.