काजीसांगवीः वाढदिवस असा केला तर समाधान…


वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे 

काजीसांगवी ः  सध्या वाढदिवस साजरे करणारे कमी नाही. रोज मोबाईल वर वाढदिवसाच्या गल्लीपासून दिल्ली पर्यंत  वाढदिवसच्या पोस्ट पाहतो. एक पोस्टर डिझाईन करुन गावभर फिरविले जाते. येथे मात्र नानाच्या वाढदिवसाला कुठले बॅनर नाही. ना कुठले पोस्टर

आपल्याला देवाने एक वर्ष आयुष्य सुखरुप देऊन आता पर्यंत 81 पर्यंत पोहचविले म्हणून मी काहीतरी समाजाचे देणे लागतो. हे डोक्यात ठेऊन श्री.केशव बोरसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने काजीसांगवी येथील प्राथमिक शाळेला 5 हजार रुपयांची वाढदिवस म्हणून मदत देण्यात आली.

जर अशी मदत ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी दिली. तर गावातील कोणत्याही विकास कामासाठी त्याची मदत होईल.  मग ते कोणतेही काम असो…कारण तुम्हाला सुखी आयुष्य दिले व तुमचे आयुष्य समाजासाठी कारणी लागावे म्हणून दिले. असे म्हणून  सर्वांनी काम केल्यास निश्चित तुम्हाला समाधान लाभेल…

आपल्या वडीलांनी वयाची 81 वर्ष पुर्ण केल्यामुळे प्राथमिक शिक्षक श्री.मंगेश बोरसे व सलून व्यावसायिक योगेश बोरसे ह्या दोन्ही भावांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काजीसांगवी शाळेला पाचहजार रूपये देणगी स्वरूपात दिले.

दोन्ही भाऊ व वडील देखील ह्याच शाळेत शिकले,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी आपल्या गावातील शाळेला देणगी स्वरूपात मदत केली.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.भुषणजी ठाकरे, सदस्य श्री.बापू ठाकरे, अंबादास मुख्याध्यापिका श्रीम. ठाकरे मँडम, शेवाळे मँडम, कापडणीस मॅडम यांच्या हस्ते श्री.केशव बोरसे दादांचा सत्कार करण्यात आला.

शिक्षक श्री. सतिश अहिरे यांनी शाळेल्या दिलेल्या देणगीबाबत आभार व्यक्त केले.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *