वेगवान नाशिक
इगतपुरी तालुक्यातील काळूस्तेजवळ असलेले निरपण येथील एक युवक भाम धरणाच्या सोडत्या पाण्यात सकाळच्या सुमारास बुडाला असल्याची माहिती जवळील ग्रामस्थांनी दिली.
या युवकास पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याबाबत प्रत्यक्षदर्शी असलेले ग्रामस्थ सांगतात. शरद मंगळू पोकळे असे त्या युवकाचे नाव असल्याचे उपस्थित लोकांनी सांगितले.
गेल्या तीन तासांपासून पोलिस नियंत्रण व गावकरी या युवकाचा शोध घेत होते बऱ्याच प्रयत्ना नंतर या युवकाचा मृतदेह सापडला हा मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेला आहेत.
घोटी पोलीस घटनास्थळी असून पुढील तपास सुरु झाला आहे. धरणाजवळ नातेवाईक आणि गावकऱ्यांनी गर्दी केली होती.