आज महाराष्ट्रात कोठे पाऊस पडणार, पहा हवामान विभागाचा इशारा


वेगवान

मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे बुधवारी देशभरात मुसळधार पाऊस झाला.  या पावसामुळे आता हवामानातही बदल दिसून येत आहे. दिवसाही वातावरण उष्ण असलं तरी आता रात्री थंडी जाणवतेय.पावसामुळे लोकांना दसऱ्याचा आनंदही घेता आला नाही.

राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. पावसानं उघडीप दिला आहे. परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार झालं आहे. सध्या जरी पावसानं उघडीप दिली असली तरी हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पुणे वगळत अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट

सध्या राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. कालपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पाच ते दहा ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून माघारी फिरणार आहे. अशातच आज हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून आठ ऑक्टोबरपर्यंत सक्रिय राहणार आहे. यामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा यासह अनेक भागांत हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडमध्ये 6-7 ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस पडेल, त्यामुळे विभागाने या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलाय. लोकांनी 8 ऑक्टोबरपर्यंत उत्तराखंडच्या डोंगराळ भागात जाण्यापासून परावृत्त करण्याचं आवाहन विभागाने केलंय.

पावसासोबत वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आता वातावरणात बदल झालाय. उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या जवळ आहे. तर रात्री थंडी पडू लागलीये. रात्रीचं किमान तापमान आता 20 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय

येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळा पूर्णपणे येईल. मात्र, दिवसा आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत असल्याने डास-माशी आणि इतर जीवाणू सक्रिय झाले आहेत. त्यामुळे लोक अनेक संसर्गजन्य आजारांनी त्रस्त आहेत.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *