व्हिडीओः पेटता रावण लोकांवर कोसळला


पेटत्या रावणाचा पुतळा लोकांवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दसऱ्याला रावणाचा पुतळा आणि मेघनाथ, कुंभकरणाचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी रावणाचा पुतळा पेटत असताना खाली कोसळला.

यावेळी काही लोक पुतळ्या जवळ उभे होते. या लोकांनी वेळीच पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली. पण, आगीचे चटके लागल्याने काहीजण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ही घटना हरियाणाच्या यमुनानगरमध्ये घडली.

हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान रामाने या दिवशी रावणाचा वध केल्यामुळे, वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणून दरवर्षी दसरा साजरा केला जातो.

यमुनानगरमधील अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. हा पुतळा लोकांच्या अंगावर पडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कुणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही, त्यामुळे जखमींना अधिकृत दुजोरा देता येणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *