लेडीकंडक्टर प्रकरणः सोशल मिडीयाच्या प्रतिक्रिया व लाईकमुळे एसटीमहा मंडाळाचे घुमजाव


वेगवान

स्वत:चे व्हिडिओ  तयार करून सोशल मीडियात (Social Media) व्हायरल करणं धाराशिव  जिल्ह्यातल्या एका लेडी कंडक्टरला (Lady Conductor) चांगलंच महागात पडलंय. तिच्यावर एसटी महामंडळानं (ST Corporation) निलंबनाची कारवाई केलीय.

कळंबा आगारातील मंगल पुरींचा गुन्हा इतकाच की कंटक्टरचा ड्रेस घआलून त्यांनी इन्स्टा रील तयार केले. त्यांनी तुळजाभवानीच्या गाण्यावर तयार केलेला व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.मंगल सागर पुरी असं या इन्स्टा स्टारचं नाव आहे.

मात्र अशा व्हिडिओमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यानंतर लगेचच घुमजाव करत ड्रायव्हर सीटवर बसून गैरवर्तन केल्याचा ठपका एसची महामंडळांनं ठेवलाय. इतकच नाही तर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकाऱ्यालाही निलंबित करण्यात आलंय.

एसटी महामंडळाच्या निर्णयाविरोधात मंगल पुरींनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. कोणतीही पूर्वकल्पना न देता आकसापोटी आपल्यावर कारवाई करण्यात आली आहे असा आरोप निलंबित महिलेने एसटी महामंडळावर केला आहे.राज्यात एसटी महामंडळात काम करणारे इतर कंडक्टर, ड्रायव्हर, मेकॅनिकल वेगवेगळे रिम्स बनवतात. त्यांच्यावर मात्र कारवाई नाही. एवढंच नाही तर माझ्याबरोबर व्हिडिओ बनवणाऱ्यावर कारवाई नाही फक्त आकसापोटी माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई आकसापोटी करण्यात आलेली आहे माझे निलंबन मागे घ्या अन्यथा कायदेशीर लढाई लढणार असल्याचा इशारा मंगलगिरी यांनी एसटी महामंडळाला दिला आहे


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *