वेगवान
शिंदेगटाच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व बदल झाला. त्यानंतर होणारा हा पहिला दसरा मेळावा आहे. त्यामुळे यंदाच्या या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर तर शिंदेगटाचा बीकेसी मैदानावर मेळावा पार पडतोय. शिंदेगटाच्या दसरा मेळाव्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.
अमित शहांच्या ताटाखालच्या मांजराचा हा दसरा मेळावा आहे, अशा शब्दात दानवे यांनी एकनाथ शिंदेवर घणाघाती टीका केली आहे.
आमचा दसरा मेळावा हा या गद्दारांच्या पिकाचा नायनाट करण्यासाठी आहे. पुढच्या दसरा मेळाव्यापर्यंत हे या राक्षसांचा नायनाट झालेला असेल, असं दानवे म्हणालेत.