अजितदादा पुढचे 15 वर्षे तुम्ही निवांत राहा -कोण कोणास म्हटले..


वेगवान

Shahajibapu Patil : अजितदादांना पहाटे जाऊन शपथ घ्यायची सवय लागली आहे. त्यामुळं पहाटे जाऊन शपथ घेतल्यावर सरकार पडेल असं त्यांना वाटतंय. पण दादा पुढचे 15 वर्षे तुम्ही निवांत राहा असे म्हणत सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला लगावला.

अधिकाऱ्यांवर दबाव तंत्र वापरायची पवार फॅमिलीची जुनी सवय असल्याचेही पवार पाटील म्हणाले. शिवतीर्थावर काय शिवसेनेचा (Shivsena) मेळावा आहे वाटले का? तिथे तर राष्ट्रवादीचाच मेळावा असेल. स्टेजवर फक्त आमचे उद्धवसाहेब मार्गदर्शन करतील असेही पाटील म्हणाले.

आमदार शहाजीबापू पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टोलेबाजी केल्याचे पाहायला मिळालं. दादा पुढचे 15 वर्षे तुम्ही निवांत राहा असे पाटील म्हणाले.

दसरा मेळाव्याच्या मुद्यावरुन देखील शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला. शिवतिर्थावर गर्दी ही अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी गोळा केलेली असेल. स्टेजवर फक्त आमचे उद्धवसाहेब मार्गदर्शन करतील असेही पाटील म्हणाले. मात्र खरे वाघाच्या अवलादी असणारे शिवसैनिक बिकेसी मौदानावर असतील असेही शहाजीबापू पाटील म्हणाले.

अडीच वर्षापूर्वीच जे घडायचे होते, ते थोडे उशीरा घडले

अधिकाऱ्यांवर दबाव तंत्र वापरायची पवार फॅमिलीची जुनी सवय असल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले. पण त्यांच्या दबावाला कोणताही अधिकारी आता बळी पडणार नसल्याचे ते म्हणाले. दसरा मेळाव्याला गर्दी ही राष्ट्रवादी काँग्रेसची असणार आहे. खरे शिवसैनिक बिकेसी मैदानावर असणार आहेत. मुंबईची जनता ही सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे राहणार असल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेल्यामुळं ते भांबावून गेले आहेत. त्यामुळं चिडून ते सगळा प्रकार करत आहेत. अडीच वर्षापूर्वीच जे घडायचे होते, ते थोडे उशीरा घडले असल्याचे पाटील म्हणाले. आमचं सरकार चांगलं काम करत असल्याचे पाटील म्हणाले.

दसरा मेळाव्याची आमची तयारी पूर्ण
आमची दसरा मेळाव्याची आमची तयारी पूर्ण झाली आहे. तयारी करणं म्हणजे फक्त व्यासपीठ तयार करणे एवढचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनं मनापासून स्विकारले आहे. त्यामुळं दसरा मेळाव्याला जनता अलोट गर्दी करेल असा विश्वास आहे. ही जनता शिंदे साहेबांना आशिर्वाद देईल आणि 100 टक्के कार्यक्रम ओके होईल असेही शहाजीबापू पाटील यावेळी म्हणाले.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *