वेगवान
देशभरातून दरवर्षी 25 सप्टेंबरपर्यंत मान्सून निघून जातो. परंतु यावेळी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.
त्यामुळे देशाच्या विविध भागात अधूनमधून मान्सूनचा पाऊस पडतोय. मात्र, 11-12 ऑक्टोबरनंतर यंदाचा मान्सून परतेल, असंही मानलं जातंय.
आता हवामान खात्याने पुन्हा एकदा 6 ऑक्टोबरपासून मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. दिल्ली-एनसीआर आणि उर्वरित देशातील हवामान कसं असेल ते जाणून घेऊया. गेल्या दोन-तीन दिवसांपासून दिल्ली-एनसीआरमधील वातावरण गार आहे. वातावरणात थोडा उष्मा आहे, पण संध्याकाळनंतर थोडीशी थंडीही जाणवतेय. याचं कारण म्हणजे यंदा मान्सूनने अजूनही निरोप घेतलेला नाही.
हवामान खात्यानुसार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये 6 ऑक्टोबरपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशाच्या ईशान्येकडील आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पुढील 3-4 दिवसांत मुसळधार पाऊस पडू शकतो. पावसासोबत जोरदार वारेही वाहतील, त्यामुळे रात्रीसह दिवसाचं तापमानही कमी होऊन लोकांना थंडी जाणवेल.