वेगवान
काही दिवसांपूर्वी अदार पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.
ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. मात्र, यावेळी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी करुन एक कोटींहून अधिक रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे.
मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या सरकारी व्यवहारांच्या पेमेंट स्लिप दाखवून फ्रँचायझी उघडण्याचे आमिष दाखवून पालघरमध्ये एका व्यक्तीची 1.31 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
वसई तालुक्यातील नालासोपारा येथील रहिवासी जतीन पवार आणि शुभम वर्मा यांच्या विरोधात स्टेशनरी दुकानाचे मालक 50 वर्षीय जिग्नेश गोपानी यांची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली.
राज्य सरकारच्या ई-पोर्टल फ्रँचायझीमध्ये खोलणार असून यामध्ये हिस्सेदारी देण्याच्या नावाखाली तक्रारदार गोपानी यांच्याकडे फी म्हणून एक लाख रुपये मागितले. दोघांनीही सारख्याच वेळा घेतल्या आणि काम सुरू होणार असल्याचे सांगितले. दोघांनी गोपनी यांच्याकडून एकूण एक कोटी 31 लाख 75 हजार 104 रुपये घेतले, असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.