ब्रेकींगः आत्मघातकी स्फोटानं एकनाथ शिंदे यांना उडवणार”


वेगवान

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी जीवे मारण्याची धमकी (threatened) देण्यात आल्याची माहिती समोर आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

महिनाभरापूर्वीच मुख्य्मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

अद्याप मुख्यमंत्री शिंदे यांना कोणी धमकी दिली याबाबत माहिती समोर आलेली नाही. आत्मघाती स्फोट घडवून मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळालेली आहे. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याचे एक पत्र मुख्यमंत्री कार्यालयात आलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री असताना देखील एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्याकडून धमकी देण्यात आली होती.

यापूर्वी आलेल्या धमकीनंतर गुप्तचर विभागाने तपास सुरु केला होता. त्यानंतर आता गुप्तचर विभागाला ही महत्त्वाची माहिती समोर आलीय. आत्मघाती स्फोट घडवून मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे आता सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *