मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला लासलगाव पोलीसांनी केले जेरबंद


लासलगाव ः मोबाईल चोरी करणाऱ्या झारखंड राज्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला लासलगाव पोलीसांना जेरबंद करण्यात यश मिळाले असून या कारवाईत ३,३१,००० रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स पो नि राहुल वाघ यांनी दिली आहे

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार खंडु बाबुराव वाळके रा पिंपळद वाळकेवाडी ता चांदवड यांच्या फिर्यादी वरुन लासलगाव पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लासलगाव येथील आठवडे बाजारातुन मोबाईल चोरी जात असल्याने त्यास प्रतिबंध होण्यासाठी मा.सचिन पाटील,पोलीस अधीक्षक,नाशिक ग्रामीण,मा माधुरी कांगणे,अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व मा . सोमनाथ तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड यांनी आदेशित केल्या प्रमाणे लासलगाव आठवडे बाजारात गस्तकामी सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उप निरीक्षक अजिनाथ कोठाळे,पोहवा कैलास महाजन,पोलीस नाईक योगेश शिंदे,देवीदास पानसरे,संजय देशमुख पोलीस कॉन्टेबल प्रदिप आजगे,भगवान सोनवणे,सागर आरोटे,सुजय बारगळ हे लासलगाव शहरामध्ये रविवारी आठवडे बाजारात गस्त करत असतांना एक इसम बाजारातील लोकांना संशियत वावरतांना मिळुन आल्याने त्यांस पोलीस ठाण्यात घेवुन त्यास नाव गाव विचारले असता त्याने त्यांचे नाव सुरजकुमार अर्जुन माहातो वय २४ वर्ष मु . महाराजपुर पोस्ट.कलयाणी ता तालझरी जि साहेबगंज राज्य झारखंड असे सांगितले,

त्याचेकडे सखोल चौकशी करता त्याने त्याचा साथीदार कुणाल कुमार रामरतन महातो ,वय १९ वर्ष ,रा महाराजपुर बाजार , ता . कलयानी , जि . साहेबगंज , राज्य झारखंड , व इतर दोन अल्पवयीन साथीदार यांचे वतीने नाशिक , औरंगाबाद , अहमदनगर जिल्हयातील आठवडा बाजारातुन मोबाईल चोरी केलीबाबत कबुली दिली असुन त्यांचेकडुन सुमारे ३,३१,००० रु किमंतीचे २४ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.

या सर्व आरोपींना मा न्यायालय निफाड येथे हजर केले असता दिनांक १ ऑक्टोंबर २२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली असुन गुन्हाचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजिनाथ कोठाळे , पोकॉ भगवान सोनवणे हे करत आहे


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *