अजित पवार यांनी स्टेजवर गाणं गात उडवली धम्माल..


वेगवान

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचं भाषण म्हणजे एरवी कार्यकर्त्यांसाठी पर्वणी असते. मात्र यावेळी अजित पवारांनी धाराशिवमधील (Dharashiv) एका कार्यक्रमात  स्टेजवर चक्क हिंदी गाणं गायलं.

त्यांचं भाषण सुरू असताना त्यांना एकामागून एक चिठ्ठ्या देण्यात आल्या. तेव्हा घे रे त्याची चिठ्ठी असं म्हणत त्यांनी स्टेजवर ‘चिठ्ठी आयी है’ हे गाणं गायलं. यावेळी कार्यकर्त्यांनीही टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत त्यांच्या गाण्याला दाद दिली.’

आधी उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकणार
दसरा मेळाव्यात (Dussehra Melava) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं भाषण एकाचवेळी सुरु झालं तर कुणाचं भाषण ऐकणार असा सवाल अजित पवार यांनी विचारण्यात आला होता. यावर अजित पवार यांनी थेट उत्तर दिलं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं भाषण एकाचवेळी सुरु झालं तर आधी उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकणार नंतर एकनाथ शिंदे यांचं भाषण असं उत्तर अजित पवार यांनी दिलं. शिवसेनेसोबत शेवटपर्यंत ऋणानुबंध जपू असंही ते म्हणाले.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *