वेगवान Shiv Sena and Shinde group launch teaser of rally
Dasara Melava: शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेनेची (Shivsena) ओळख असलेल्या दसरा मेळाव्यावर (Dasara Melava) शिंदे गटाने दावा केला होता.
दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्कचे मैदान देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. तर, दुसऱ्या बाजूला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे.
या मेळाव्याआधीच शिवसेना आणि शिंदे गटात टीझर वॉर सुरू झाले आहे. शिंदे गटाने दोन टीझर लाँच केले असून शिवसेनेने आज पहिला टीझर लाँच केला आहे.
शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली आहे. या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाने आपला गटच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. दसरा मेळाव्यासाठी दोन्ही बाजूने गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आली आहे.
मेळाव्यापूर्वी टीझर लाँच
शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी टीझर लाँच केले आहेत. गुरुवारी लाँच केलेल्या टीझरमध्ये ‘एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ’ अशा ओळी आहेत. टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचा वापर करण्यात आला आहे.
#दसरा_मेळावा_२०२२ pic.twitter.com/mCQZs6rufq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 29, 2022