वेगवान
मुंबई : सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत सुरू असलेल्या वादावरून निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. तसंच निवडणूक आयोगही चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या परस्परविरोधी दाव्यांबाबत निवडणूक आयोगाकडून काय निर्णय देण्यात येतो, याबाबत राज्यासह देशभरात उत्सुकता निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आज माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
‘एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देणे किंवा निवडणूक चिन्ह देण्याच्या अर्जावर निर्णय देताना पूर्णपणे पारदर्शक पद्धतीचा अवलंब केला जाईल,’ असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. तसंच निवडणूक आयोगाकडे बहुमताच्या नियमाची पारदर्शक प्रक्रिया आहे आणि या प्रकरणातही आयोगाकडून ती प्रक्रिया केली जाईल, असंही ते म्हणाले.