वेगवान
मुंबईः – भाजपच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतंच केलेलं एक विधान चर्चेत आलं आहे. आपल्या भाषणात त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या नावाचा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. घराणेशाहीवर बोलताना जनमानसात माझी प्रतिमा चांगली असेल तर मोदीही माझं राजकारण संपवू शकणार नाहीत, असं पंकजा म्हणून गेल्या.
प्रतीक आहे, पण मला कोणी संपवू शकणार नाही. मोदीजी पण, जर मी तुमच्या मनात राज्य केलं असेल तर. तुमच्यामुळं जर मी काही चांगलं करु शकले तर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला राजकारणात स्वच्छता आणायची आहे,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
यावर भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी पंकजा यांचा बचाव केला आहे. मुनगंटीवार म्हणाले की, वंशवादाचं राजकारण कर्तृत्व नसताना मुलगा एखाद्या पदावर जातो. तो पात्र असो वा नसो. मोदीजी त्याच्या विरोधात आहे. मात्र जनतेने मला निवडून दिलं तर मला वंशवादाच्या बाहेर जावून जननेता म्हणून मान मिळू शकतो, असं पंकजा यांना म्हणायच असेल, असच प्रतीत होतं. मात्र यावर पंकजा मुंडे सविस्तर सांगू शकतील, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं.